'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळून ऑटोचालकाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; VIDEO काढून करत होता ब्लॅकमेल

केरळमधील अडूर येथे एका ऑटोचालकाने महिलेच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने महिलेचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Mayuri Gawade

केरळमधील अडूर येथे एका ऑटोचालकाने महिलेच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही, तर आरोपीने संबंधित महिलेचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचा छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विनोद नावाच्या ऑटोचालकाला अटक केली असून, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता.

प्रवासादरम्यान झाली ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडित महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आरोपी विनोदच्या घराजवळ राहत असल्याचं सांगितलं जात आहे. महिला प्रवासासाठी वारंवार विनोदच्या ऑटोचा वापर करत असल्याने दोघांमध्ये ओळख निर्माण झाली होती.

ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळल्याचा आरोप

फेब्रुवारी महिन्यात आरोपीने महिलेला ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यानंतर आरोपीने महिलेचे काही व्हिडिओ शूट केले आणि ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वारंवार तिचा लैंगिक छळ केल्याचा दावा करण्यात आला आहे.

पतीला सांगितल्यानंतर वाढला वाद

आरोपीकडून धमक्या सुरूच राहिल्यानंतर संबंधित महिलेने अखेर संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने महिलेवर मारहाण केल्याचाही आरोप आहे. यानंतर पीडित महिलेने गेल्या महिन्यात अडूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फरार आरोपी अखेर जेरबंद

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, अटकेत विलंब होत असल्याने पीडित महिलेने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव घेतली. त्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आणि शुक्रवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणाशी संबंधित डिजिटल पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च