संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

निवडणूक आयोगाने आता मतदार घोटाळ्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. निवडणूक आयोग आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आता मतदार घोटाळ्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. निवडणूक आयोग आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहेत.

“मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, अलांड विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली होती. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सुरुवातीला काही कागदपत्रे दिली होती, परंतु आता महत्त्वाचे पुरावे देण्यास नकार देत आहे, जेणेकरून खऱ्या गुन्हेगारांना वाचवता येईल,” असे खर्गे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप खर्गे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांना निराधार म्हटले आहे. “मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, तपास संस्थांना अलांड विधानसभा मतदारसंघात ५,९९४ बनावट अर्ज आढळले होते, जे मतदारांना हटवण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रयत्नाचा पुरावा होते. काँग्रेस सरकारने याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. तपासाच्या सुरुवातीला ईडीने पुरावे दिले होते, परंतु आता ते भाजपच्या दबावाखाली माहिती शेअर करत नाही,” अशी टीकाही खर्गे यांनी केली.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला

मुरुड समुद्र किनारी वाहून आलेल्या १४९ मूर्तींचे श्रीसदस्यांनी केले पुन्हा विसर्जन