राष्ट्रीय

कर्करोग उपचारात तज्ज्ञांची कमतरता जाणवणार; ‘लॅन्सेट ऑन्कोलॉजी कमिशन’चा अहवाल

२०५० पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा मुख्य फटका कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना बसेल. तसेच २०५० पर्यंत जगभरात कर्करोग सेवा क्षेत्रातील सुमारे १० कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल, असा अंदाज ‘लॅन्सेट ऑन्कोलॉजी कमिशन’ने व्यक्त केला.

Swapnil S

नवी दिल्ली : २०५० पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा मुख्य फटका कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना बसेल. तसेच २०५० पर्यंत जगभरात कर्करोग सेवा क्षेत्रातील सुमारे १० कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल, असा अंदाज ‘लॅन्सेट ऑन्कोलॉजी कमिशन’ने व्यक्त केला.

जागतिक स्तरावर कर्करोग उपचार क्षेत्रातील कर्मचारी वर्गात सर्वसमावेशक वाढ केल्यास, दक्षिण आशियाई देशांसह ५५ देशांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकते.

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या (सर्जन) संख्येत वाढ केल्यास जागतिक स्तरावर कर्करोगाच्या मृत्यूंमध्ये ३.६४ टक्क्यांची सर्वाधिक घट होऊ शकते, विशेषतः आफ्रिका, आशिया आणि ओशनिया खंडात हा फरक जास्त दिसेल. तर दुसरीकडे, रोगनिदान आणि इमेजिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केल्यास मृत्यूच्या प्रमाणात ७.६१ टक्क्यांची सर्वात मोठी घट दिसून येऊ शकते.

अमेरिकेतील 'हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ', ऑस्ट्रेलियातील 'ला ट्रोब युनिव्हर्सिटी' आणि ब्राझीलमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो' येथील संशोधकांसह आंतरराष्ट्रीय लेखकांच्या एका गटाने म्हटले आहे की, ‘कर्मचारी वर्गाच्या सर्व स्तरांवर सर्वसमावेशक वाढ केल्यास ५५ देशांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक फायदा आफ्रिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण आशियाला होईल.’

२०५० मध्ये जागतिक स्तरावर कर्करोग उपचार कर्मचाऱ्यांची कमतरता साधारण १० कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक कमतरता परिचारिका आणि निदान तज्ज्ञ यांची असेल, विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात ही टंचाई प्रकर्षाने जाणवेल.

विविध अभ्यासांमधील रुग्णांच्या जगण्याच्या दराच्या विश्लेषणानुसार, २०५० मध्ये हा दर आफ्रिकेत सर्वात कमी (३४.४ टक्के) आणि आशियात (३८.७ टक्के) असेल, तर उत्तर अमेरिकेत (६३.९ टक्के) आणि ओशनियामध्ये (७० टक्क्यांहून अधिक) तो सर्वाधिक असेल.

‘कर्करोगावर उपचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता हाच उच्च उत्पन्न असलेले देश आणि कमी व मध्यम उत्पन्न असलेले देश यांच्यातील कर्करोग जगण्याच्या दरातील असमानता कमी करण्यातील एक मोठा अडथळा ठरत आहे.

१७ कोटी मृत्यू टाळता येतील

कर्करोग कर्मचारी वर्गात वाढ केल्यास १७ कोटी मृत्यू टाळता येऊ शकतात आणि मृत्यूचे प्रमाण सुमारे ४० टक्क्यांनी कमी होऊ शकते. त्याचवेळी, २०३० ते २०५० दरम्यान यामुळे अंदाजे १२० ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा आर्थिक फायदा होईल, म्हणजेच "गुंतवणूक केलेल्या प्रत्येक १ डॉलरवर जागतिक स्तरावर ४ डॉलरचा परतावा मिळेल.

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट