राष्ट्रीय

'पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला संपवणार...'; लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावे धमकी, पोस्ट व्हायरल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशवासियांमध्ये प्रचंड संताप आहे. अशात आता गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Krantee V. Kale

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशवासियांमध्ये प्रचंड संताप आहे. अशात आता गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यात, पाकिस्तानात घुसून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदला संपवणार, अशी थेट धमकी देण्यात आली आहे. पोस्टमध्ये हाफिजचे नाव घेतले नसले तरी त्याचा फोटो वापरण्यात आला असून त्यावर लाल फुली मारण्यात आली आहे.

पाकमध्ये घुसून लाखाच्या बरोबर ठरेल अशा एकाच माणसाला संपवू

पहलगाममध्ये निरागस लोकांना त्यांची काहीही चूक नसताना मारण्यात आले. याचा आम्ही लवकरच बदला घेऊ. पाकिस्तानात घुसून एकाच अशा माणसाला संपवू जो एक लाखाच्या बरोबर असेल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत हाफिज सईदचा फोटो वापरण्यात आला आहे. सईदच्या फोटोवर लाल फुली देखील मारली आहे.

'ईंट का जवाब पत्थर से' देणार

तुम्ही हात पुढे केला, तर आम्ही मिठीत घेऊ; पण जर डोळे रोखले तर डोळेच काढून टाकू आणि जर याहून घाण कृत्य केलं तर 'ईंट का जवाब पत्थर से' देऊ, तेही थेट पाकिस्तानात घुसून. पोस्टच्या अखेरीस 'जय हिंद, जय भारत' असे लिहिले असून लॉरेंस बिश्नोई ग्रुप, जितेंद्र गोगी ग्रुप, हाशिम बाबा, काला राणा, गोल्डी ब्रार, रोहित गोदारा, यांच्याकडून ही धमकी देण्यात आल्याचंही म्हटलंय.

बघा व्हायरल झालेली पोस्ट

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'टीआरएफ' (द रेझिस्टन्स फ्रंट) ने स्वीकारली आहे. मात्र, टीआरएफ हे फक्त वेगळं नाव असून ही दहशतवादी संघटना म्हणजे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचाच दुसरा चेहरा आहे.

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सशस्त्र दलांना प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि अचूक वेळ ठरविण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. या हल्ल्यामागील दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना हुडकून त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देण्याचा निर्धार मोदी यांनी हल्ल्यानंतर व्यक्त केला होता.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती