राष्ट्रीय

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी

Swapnil S

प्रयागराज : इंडिया आघाडीची प्रयागराजमध्ये रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव संबोधित करणार होते. मात्र, राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे व्यासपीठावर पोहोचताच समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे राहुल गांधी व अखिलेश यांना भाषण न करताच निघून जावे लागले.

अखिलेश यादव यांनी समर्थकांचा गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, तरीही १५ ते २० मिनिटे गोंधळ सुरूच राहिला. अखेर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना भाषण न करताच निघून जावे लागले. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. या सभेला लोकांनी केलेल्या गर्दीची मोठी चर्चा रंगली आहे.

फूलपूर लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी आले होते. मात्र, समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेत केलेल्या गोंधळानंतर अखिलेश यादव हे संतापून निघून गेले. त्यानंतर राहुल गांधीही निघून गेले. दरम्यान, लोकांनी राहुल गांधी यांच्या या सभेला केलेल्या अभूतपूर्व गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस