भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे
राष्ट्रीय

बिहारमध्ये ‘रालोआ’चे जागावाटप जाहीर; भाजप १७, जेडीयू १६ जागा लढवणार

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी बिहारमधील रालोआचे जागावाटप निश्चित झाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी बिहारमधील रालोआचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार भाजप १७, संयुक्त जनता दल (जेडीयू) १६ आणि लोकजनशक्ती पक्ष ५ जागा लढणार आहे.

रालोआचे अन्य दोन घटक पक्ष हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकमोर्चा प्रत्येकी एक जागा लढणार आहे, असे भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी सोमवारी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.

बिहारमधील एकूण ४० पैकी १७ जागा भाजप, तर संयुक्त जनता दल १६ जागा लढणार आहे. त्याचप्रमाणे लोकजनशक्ती पार्टी पाच जागा लढणार असून चिराग पासवान हे हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली