राष्ट्रीय

महाकुंभात नव्या विक्रमाची नोंद, ६५ कोटी भाविकांचे संगमात स्नान; महाशिवरात्रीच्या शाही स्नानानंतर महाकुंभमेळ्याचा समारोप

उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभमेळ्यात ४५ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला होता.

Swapnil S

प्रयागराज : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची महाशिवरात्रीच्या शाही स्नानानंतर बुधवारी सांगता झाली. महाकुंभमेळ्यात तब्बल ६५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान करत एका नव्या विक्रमाची नोंद केली. २०१९च्या कुंभमेळ्यात २४ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली होती. जगातील कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले नव्हते, त्यामुळे महाकुंभाच्या निमित्ताने एका जागतिक विक्रमाचीही नोंद झाली.

उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभमेळ्यात ४५ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला होता. पण प्रयागराजमध्ये यंदा तब्बल ६५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. याचाच अर्थ, सरासरी दीड कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची आकडेवारी आहे. महाशिवरात्रीनिमित्त शेवटच्या अमृत स्नानात दीड कोटी लोकांनी डुबकी मारली.

महाशिवरात्रीच्या दिवशी संगमावर हजारो लोक शाही स्नान करण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी तर दुपारी ४ वाजेपर्यंत सव्वा कोटी लोकांनी शाही स्नान केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यामुळे भाविकांना सुखद आनंदाचा धक्का बसला.

महाकुंभमेळ्यात गेल्या ४५ दिवसात सहा प्रमुख पवित्र स्नान पार पडले. यामध्ये तीन शाही स्नान हे मकर संक्रांती, मौनी आमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी पार पडले. तर उर्वरित तीन स्नान हे पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला पार पडले.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके