ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट (Photo-X)
राष्ट्रीय

ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

पश्चिम बंगालमधील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

तृणमूलमधील या मोठ्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची पुढील रणनीती काय असावी, यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन