राष्ट्रीय

ममतांची राजीनाम्याची तयारी, पश्चिम बंगाल डॉक्टरांच्या आंदोलनाचा तिढा कायम

पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांनी सरकारसमवेतच्या चर्चेचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी रेटून धरली असून, ती पूर्ण होईपर्यंत चर्चा न करण्याचा पवित्रा घेतल्याने गुरुवारीही तिढा सुटू शकला नाही.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांनी सरकारसमवेतच्या चर्चेचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी रेटून धरली असून, ती पूर्ण होईपर्यंत चर्चा न करण्याचा पवित्रा घेतल्याने गुरुवारीही तिढा सुटू शकला नाही. या प्रकाराने उद्विग्न झालेल्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेच्या हितासाठी राजीनामा देण्यासही आपण तयार असल्याचे सांगितले.

आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या पीडितेला न्याय मिळावा, अशीच आपली इच्छा असल्याचेही ममता म्हणाल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत डॉक्टरांसमवेत चर्चा होणार होती. डॉक्टरांसमवेत चर्चा करण्यासाठी ममतांनी जवळपास एक तास प्रतीक्षा केली, मात्र ते चर्चेसाठी फिरकलेच नाहीत. निदर्शक ठरलेल्या ठिकाणी ५.२५ वाजता म्हणजे तब्बल २५ मिनिटे उशिराने पोहोचले. त्यांनी चर्चेला यावे यासाठी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य अधिकारी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी ममता त्यांची प्रतीक्षा करीत होत्या.

अखेर या सर्व प्रकाराने उद्विग्न झालेल्या ममतांनी आपण पश्चिम बंगालमधील जनतेच्या हितासाठी पदाचा राजीनामाही देण्यास तयार असल्याचे सांगितले. गुरुवारी तिढा सुटण्याची जनतेची अपेक्षा होती, मात्र तिढा कायम असल्याने आपण माफी मागतो, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. गेल्या तीन दिवसांपासून तिढा सुटण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, तरीही डॉक्टर चर्चेला आले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी