Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल X व्हिडिओ स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

मोदी आणि मेलोनी यांच्या नावांपासून तयार झालेला 'Melodi' हा शब्द यापूर्वीही सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी बुधवारी (दि.२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोम दौऱ्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. "Thank you for the gift" असे कॅप्शन देत पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मोदी आणि मेलोनी एकत्र दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये मेलोनी म्हणतात, "पंतप्रधान मोदी माझ्यासाठी खूप छान Melody टॉफी घेऊन आले आहेत." यावेळी मोदी यांच्या हातात मेलोडी टॉफीचे पाकीटही दिसते. त्यानंतर दोघेही हसताना दिसतात. हा हलकाफुलका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'मेलोडी' मीम्स पुन्हा व्हायरल

मोदी आणि मेलोनी यांच्या नावांपासून तयार झालेला 'Melodi' हा शब्द यापूर्वीही सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिला आहे. दोन्ही पंतप्रधान एकत्र दिसले की 'मेलोडी टीम'चे मीम्स व्हायरल होत असतात. या नव्या व्हिडीओनंतरही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, "Parle ला जगभरात फ्री एंडोर्समेंट मिळाली," अशी प्रतिक्रिया दिली.

रोममध्ये डिनर आणि कोलोसियम भेट

रोममध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत डिनर मिटिंग घेतली. त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी ऐतिहासिक 'कोलोसियम'ला भेट देत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

मोदी यांनी एक्स (X) वर पोस्ट करत म्हटले की, रोममध्ये मेलोनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भारत-इटली संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

G७ समिटमध्येही चर्चेत आली होती 'मेलोडी टीम'

यापूर्वी G७ समिटदरम्यानही मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी आणि व्हिडीओ शेअर केला होता. त्या वेळी त्यांनी "Hello from the Melodi team" असे म्हणत पोस्ट केली होती. तसेच २०२३ मध्ये दुबई येथे झालेल्या COP२८ परिषदेदरम्यानही मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी शेअर करत "Good friends at COP28. #Melodi" असे लिहिले होते.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील धरणात केवळ ४० टक्के साठा; जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर आव्हान