ANI
राष्ट्रीय

मोहम्मद जुबेरला जामीन मंजूर पण... या आहेत अटी ?

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या जुबेरच्या याचिकेवर उत्तर प्रदेश पोलिसांनाही नोटीस

वृत्तसंस्था

सुप्रीम कोर्टाने Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्याविरुद्ध सीतापूर, यूपी येथे दाखल केलेल्या गुन्ह्यात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या जुबेरच्या याचिकेवर उत्तर प्रदेश पोलिसांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाने झुबेरला या अटीवर 5 दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 

काय आहे अट ?

मोहम्मद जुबेर या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यावर कोणतेही नवीन ट्विट करणार नाही आणि सीतापूर दंडाधिकारी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सोडणार नाही. 

दिल्ली पोलिसांनी २०१८ मधील एका तक्रारीच्या आधारावर जुबेरवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला या पाच दिवसात दिल्लीबाहेर जाता येणार नाही.

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

जपानमधून ‘टायफून’ क्षेपणास्त्र हटवा! चीनची अमेरिकेकडे मागणी

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले