राष्ट्रीय

गुजरात सरकार व फॉक्सकॉन ग्रुप यांच्यात सामंजस्य करार

या प्लांटच्या स्थापनेमुळे भारताची प्रतिमा सेमीकंडक्टर चिप टेकर ते चिप मेकर अशी बदलेल

वृत्तसंस्था

गुजरातमधील गांधीनगर येथे राज्य सरकार आणि भारतीय कंपनी वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन ग्रुप यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना, वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले, गुजरातमध्ये वेदांत आणि फॉक्सकॉन ग्रुपचे संयुक्त सेमीकंडक्टर युनिट स्थापन केले जाणार आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे.

उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, या प्लांटच्या स्थापनेमुळे भारताची प्रतिमा सेमीकंडक्टर चिप टेकर ते चिप मेकर अशी बदलेल. या प्लांटमधून थेट एक लाख कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुजरातमध्ये निर्माण होणाऱ्या या नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे.

ते म्हणाले, हे पाऊल भारताला स्वावलंबी सिलिकॉन व्हॅलीकडे जाण्यास मदत करेल. राज्यातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिट हा प्रदेश आपले केंद्र बनवेल. आत्तापर्यंत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले वगळता बाकीचे उत्पादन आमच्या कारखान्यांमध्ये होत होते.

यावेळी भूपेंद्र पटेल म्हणाले, गुजरातमध्ये युनिट उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत