राष्ट्रीय

माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय कालवश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने कोलकातामधील साल्ट लेक येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने कोलकातामधील साल्ट लेक येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशू रॉय यांनी याविषयी माहिती दिली. डिमेंशियाचे निदान झालेले मुकुल रॉय अनेक आजारांनी ग्रस्त होते आणि काही दिवसांपूर्वी ते कोमात गेले होते.

राजकीय कारकीर्द

मुकुल रॉय यांनी युवक काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यावेळी ममता बॅनर्जी यांचे ते निकटचे सहकारी झाले. १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनीही काँग्रेसचा हात सोडला. अल्पावधीतच ते पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा झाले. २००६ मध्ये त्यांना तृणमूलचे महासचिवपद मिळाले.

पुढे यूपीए २ सरकारच्या कार्यकाळात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रि‍पदाची धुरा सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुकुल रॉय यांच्याकडे केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले मुकुल रॉय हे ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू मानले जात. मात्र २०१५ मध्ये बॅनर्जींसोबत त्यांचे तीव्र मतभेद झाले.

तृणमूल-भाजप-तृणमूल

२०१७ मध्ये भाजप नेते अरुण जेटलींची भेट घेतल्याने त्यांना तृणमूलमधून निलंबित करण्यात आले होते. काही दिवसातच त्यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला. परंतु २०२१ मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

'उडती' मुंबई; गोरेगावात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, सहा जणांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Mumbai : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर लोटला जनसागर; देशभरातील अनुयायांचे महामानवाला अभिवादन

अशोक खरातकडील गुंगीच्या औषधाचे धागेदोरे शोधणार; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

Mumbai : अंधेरीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; महिन्याला २५ ते ३० कोटींच्या एमडी ड्रग्जची विक्री

रिक्षा, टॅक्सीचालकांना १ मेपासून मराठी बंधनकारक; मराठी भाषा येत नसल्यास परवाने रद्द; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती