(संग्रहित छायाचित्र) 
राष्ट्रीय

रस्त्यावर नमाज: हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिका - योगी

ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आल्याच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार समर्थन केले आहे.

Swapnil S

लखनऊ : ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आल्याच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार समर्थन केले आहे. रस्ते चालण्यासाठी असतात, असे स्पष्ट करून आदित्यनाथ यांनी हिंदूंकडून शिस्त शिकण्याचा सल्ला यावेळी दिला.

ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मेरठमध्ये मनाई करण्यात आल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाल्याचे पाहावयास मिळाले. मेरठनंतर इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे आदेश पारित करण्यात आले. यासंदर्भात वाद-प्रतिवाद चालू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आदेशांचे समर्थन केले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात मेरठमध्ये घडलेल्या काराबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. मेरठमध्ये रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच, अशी स्थिती दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता. यावर काही आक्षेप घेण्यात आल्याबाबत विचारणा केली असता योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली.

...तर जीवावर बेतू शकते!

अशा प्रकारचे उत्सव बेशिस्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन बनता कामा नयेत. तुम्हाला सुविधा हवी असेल तर शिस्त पाळावी लागेल. तुम्ही या सगळ्याची तुलना करताय कावड यात्रेशी. कावड यात्रा हरिद्वारपासून गाझियाबादपर्यंत जाते. त्यामुळे ते रस्त्यावरूनच चालणार. आम्ही कधी मुस्लिम समुदायाची मिरवणूक अडवली आहे का, मोहरमचीही मिरवणूक निघते. आम्ही हे सांगितले की, ताजियाची उंची कमी करा. पण ते तुमच्या सुरक्षेसाठी, वर विजेच्या तारा असतात. त्यामुळे उंची कमी करा, असे सांगतो. विजेच्या तारांचा धक्का बसला तर जीवावर बेतू शकते, असे आदित्यनाथ यांनी नमूद केले.

इदगाह किंवा मशीद

कावड यात्रेतही आम्ही सांगितले, की डीजेची उंची कमी करा. जे करत नाहीत त्यांच्यावर आम्ही सक्ती करतो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो. ईदच्या दिवशी तुम्ही तासन‌्तास नमाज पढण्याच्या नावाखाली रस्ता रोखून ठेवणार का, नमाज पढण्यासाठीची जागा इदगाह किंवा मशीद असू शकते. रस्ता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

मेरठ प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे समर्थन करताना योगी म्हणाले की, मेरठमध्ये जे आदेश निघाले ते बरोबरच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात. जे लोक हे बोलत आहेत, त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी ६६ कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, हल्ले, छेडछाड, तोडफोड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही आहे धार्मिक शिस्त. श्रद्धेने आले, महास्नान केले आणि आपापल्या घरी परतले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री