'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन X
राष्ट्रीय

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयासह आता 'गंगोत्री ते गंगासागर' पर्यंत कमळ फुलले आहे. सूडबुद्धीऐवजी बदलासाठी काम करण्याचे आणि राज्याचे भवितव्य भीतीवर मात करेल याची खातरजमा करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना सोमवारी येथे केले.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयासह आता 'गंगोत्री ते गंगासागर' पर्यंत कमळ फुलले आहे. सूडबुद्धीऐवजी बदलासाठी काम करण्याचे आणि राज्याचे भवितव्य भीतीवर मात करेल याची खातरजमा करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना सोमवारी येथे केले. आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. वर्षांच्या तपश्चर्येचे फलित जेव्हा प्राप्तीत बदलते, तेव्हा चेहऱ्यावर जो आनंद चेहऱ्यावर मी पाहत आहे, असेही ते म्हणाले.

पश्चिम बंगाल, आसाम आणि दिसतो, तोच आनंद आज पुद्दुचेरी येथील विधानसभा देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतील विजयानंतर नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, हा दिवस अनेक अर्थानी विशेष आहे, कारण तो देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. ४ मे ची ही संध्याकाळ जरी मावळत असली, तरी बंगालच्या पवित्र भूमीवर एका नव्या सूर्योदयाचा उदय झाला आहे, असेही ते म्हणाले.

हा दिवस भारताच्या महान लोकशाहीवरील विश्वासाचा, कामगिरीच्या राजकारणावरील विश्वासाचा, स्थिरतेच्या निर्धाराचा आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या भावनेचा आहे. मी पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळच्या जनतेसमोर नतमस्तक होतो, असे ते म्हणाले. या विजयोत्सव कार्यक्रमात भाजप अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'गंगोत्री ते गंगासागर' म्हणजे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या गंगामातेच्या परिसरातील राज्यांमध्ये आता भाजप-एनडीए सरकारांची स्थापना झाली आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत महिलांचा अभूतपूर्व सहभाग दिसून आला, जो भारतीय लोकशाहीचे सर्वात उज्ज्वल चित्र आहे. पंतप्रधानांनी निवडणूक आयोग, त्यांचे कर्मचारी, मतदान प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व कर्मचारी आणि विशेषतः सुरक्षा दलांचे यशस्वी निवडणुकीचे संचालन केल्याबद्दल अभिनंदन केले. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्यात तुमच्या योगदानाची इतिहासात नेहमी नोंद घेतली जाईल, असे ते म्हणाले.

विजय जनतेला समर्पित

बंगालमधील आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी या विजयासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अनेक महिला भाजप कार्यकर्त्यांना अत्याचार सहन करावे लागले आहेत. केरळ आणि बंगालमधील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला किती कष्ट सहन करावे लागले आहेत, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्यावर किती अत्याचार आणि दडपशाही झाली आहे. आज, मी बंगालमधील भाजपच्या यशाचे श्रेय अशा सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देतो. मी हा विजय बंगालच्या जनतेला समर्पित करतो.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग