मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा, काळ्या समुद्रात भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित X| @PMOIndia
राष्ट्रीय

मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा, काळ्या समुद्रात भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत काळ्या समुद्रातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. वाढत्या भू-राजकीय उलथापालथीच्या काळात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली, तसेच युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी कोणत्याही शांतता उपक्रमाला पाठिंबा देण्यास भारत तयार असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत काळ्या समुद्रातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. वाढत्या भू-राजकीय उलथापालथीच्या काळात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली, तसेच युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी कोणत्याही शांतता उपक्रमाला पाठिंबा देण्यास भारत तयार असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला.

‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन तीन दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर काही तासांत ही बैठक पार पडली. या चर्चेनंतर दोन्ही नेते ‘भारत मंडपम’ संकुलात बिझनेस फोरमच्या ठिकाणी जाण्यासाठी एकाच कारमधून गेले.

भारतीय निवेदनानुसार, विविध क्षेत्रांमध्ये सखोल सहभाग कायम ठेवण्याचा दृढ संकल्प व्यक्त करताना, दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया "विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’ आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे मान्य केले. ही भागीदारी भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही लवचिकता दाखवत सातत्याने महत्त्वपूर्ण वाढ नोंदवत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाला भेट देण्याचे पुतिन यांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले आहे.

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे, नागरी अणुऊर्जा आणि नागरिकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावरही सहमती दर्शवली आहे.

तमिळ काव्यसंग्रह पुतीन यांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ‘थिरुक्कुरल’च्या रशियन भाषांतराची प्रत भेट दिली. थिरुक्कुरल हा महान कवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लुवर यांनी रचलेला अभिजात तमिळ काव्यसंग्रह आहे. थिरुवल्लुवर यांची ही अत्यंत महत्त्वपूर्ण कृती असून यामध्ये विविध विषयांवरील ज्ञानाचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे.

१०० अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य

भारत-रशिया व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा आढावा घेताना, दोन्ही बाजूंनी २०३० पर्यंत वार्षिक द्विपक्षीय व्यापार प्रमाण सध्याच्या ६५ अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा