राष्ट्रीय

मेंदूतील विद्युत हालचाली टिपणारे ‘मानस-१’ मॉडेल; ‘न्यूरो डीक्स.एआय’ कंपनीकडून विकासित

डीप-टेक क्षेत्रातील ‘न्यूरो डीक्स.एआय’ कंपनीने मानवी मेंदूतील विद्युत हालचाली उलगडून दाखवणारे ४०० दशलक्ष पॅरामीटर्सचे एआय ‘ब्रेन लँग्वेज मॉडेल’ विकसित केल्याची माहिती मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : डीप-टेक क्षेत्रातील ‘न्यूरो डीक्स.एआय’ कंपनीने मानवी मेंदूतील विद्युत हालचाली उलगडून दाखवणारे ४०० दशलक्ष पॅरामीटर्सचे एआय ‘ब्रेन लँग्वेज मॉडेल’ विकसित केल्याची माहिती मंगळवारी दिली. ‘मानस-१’ असे या मॉडेलचे नाव असून, मेंदूविकारांच्या निदान पद्धतींमध्ये विशेषतः न्यूरोसायन्स क्षेत्रात-मूलभूत बदल घडवण्याची क्षमता त्यात आहे.

कंपनीचे संस्थापक सिद्धार्थ पनवार यांनी सांगितले की, या मॉडेलच्या मदतीने मेंदूविकारांचे लवकर निदान   व अधिक अचूक उपचार शक्य होतील. ‘मानस-१’चे मूल्यमापन व प्रमाणीकरण करण्यासाठी ते सरकारकडे सादर करण्यात आले असून, सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांसाठी उदयास येणाऱ्या मानकांनुसार त्याची पडताळणी केली जाणार आहे.

सरकारी मान्यता मिळाल्यानंतर निधीही उपलब्ध होणार असून, त्यातून उत्पादनाचा पुढील विकास साधता येईल, असे पनवार यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांत या मॉडेलचे पॅरामीटर्स वाढवून ते २ अब्जांपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे.

‘मानस-१’च्या सहाय्याने मिरगी (एपिलेप्सी) तसेच मानसिक आरोग्यविकारांशी संबंधित बायोमार्कर्स ओळखण्यात अचूकता साध्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मानवी जैविक संकेतांचे अर्थ लावून प्रगत आरोग्य व न्यूरोलॉजिकल आकलन देऊ शकणारे, भारतातील पहिले फाऊंडेशन- स्केल फिजिओलॉजिकल स्टेट मॉडेल विकसित करण्याच्या व्यापक संशोधन प्रयत्नांचा हा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. एआय क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आमचे उत्पादन सर्वोच्च मानकांशी सुसंगत ठरेल.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा