राष्ट्रीय

New Income Tax Bill : नवीन प्राप्तिकर विधेयक आज कॅबिनेटमध्ये मांडले जाणार?

नवीन प्राप्तिकर कायद्याचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे. तत्पूर्वी हे विधेयक शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन प्राप्तिकर कायद्याचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे. तत्पूर्वी हे विधेयक शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थ सचिव तुहीन कांता पांडे म्हणाले की, या नवीन विधेयकात मोठी वाक्य, तरतुदी व स्पष्टीकरण नसतील. नवीन विधेयक पुढील आठवड्यात सादर होईल. मात्र, हे विधेयक वेगळे असेल. नवीन कायदा सोपा असेल. कायदे म्हणजे केवळ तो कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना समजावा असे नाही. तो नागरिकांना समजला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नवीन प्राप्तिकर विधेयक हा ६० वर्षं जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेणार आहे. या नवीन कायद्याबाबत शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग