कुनो अभयारण्यात आणखी नऊ चित्त्यांचे आगमन Photo : X (byadavbjp)
राष्ट्रीय

कुनो अभयारण्यात आणखी नऊ चित्त्यांचे आगमन; देशातील चित्त्यांची एकूण संख्या ४८ वर

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नवे पाहुणे आले. आफ्रिकेतील बोत्स्वाना येथून नऊ चित्ते अभयारण्यात दाखल झाले आहेत. या चित्त्यांना विशेष हेलिकॉप्टरद्वारे आणण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. नव्या पाहुण्यांमुळे आता देशातील चित्त्यांची एकूण संख्या ३९ वरून ४८ वर पोहोचली आहे.

Swapnil S

शेवपूर : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नवे पाहुणे आले. आफ्रिकेतील बोत्स्वाना येथून नऊ चित्ते अभयारण्यात दाखल झाले आहेत. या चित्त्यांना विशेष हेलिकॉप्टरद्वारे आणण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. नव्या पाहुण्यांमुळे आता देशातील चित्त्यांची एकूण संख्या ३९ वरून ४८ वर पोहोचली आहे.

या नव्या पाहुण्यांमध्ये सहा मादी चित्ते, तर ३ नर चित्ते आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी क्रेटचेnहॅण्डल फिरवून या चित्त्यांना क्वारंटाईन भागात मुक्त केले. उर्वरित चित्त्यांना वनविभागाच्या प्रशिक्षित पथकाने नियमानुसार त्यांच्या कक्षात हलविले आहे. मादी चित्त्यांचे प्रमाण वाढल्याने भविष्यात प्रजननाचा दर वाढेल आणि चित्त्यांमधील प्रादेशिक संघर्ष कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आता कुनोमध्ये एकूण ३५ वयस्क चित्ते असून त्यामध्ये १८ मादी तर १७ नर चित्ते आहेत. नवे नऊ चित्ते पुढील एक महिना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली क्वारण्टाईन राहणार आहेत. या कालावधीत त्यांच्या आरोग्याची, वागणुकीची आणि येथील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची बारकाईने पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर चिता स्टिअरिंग समितीच्या निर्णयानुसार त्यांना मुक्त जंगलात सोडण्यात येणार असून प्रत्येक चित्त्याची शिकार करण्याची पद्धत आणि हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्यांना निसर्गात मुक्त केले जाईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये