ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला 
राष्ट्रीय

ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत बुधवारी आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून, आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत बुधवारी आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून, आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. सभागृहाच्या कामकाजात भेदभाव केल्याचा आरोप ओम बिर्ला यांच्यावर करण्यात आला होता.

विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर लोकसभेत सलग दोन दिवस चर्चा झाली. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.

चर्चा संपल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. आवाजी मतदानाच्या आधारे लोकसभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार असून विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदानानंतर, पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.

अमित शहा यांनी केले बिर्ला यांचे समर्थन

चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्षांचे जोरदार समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अध्यक्षांचे पद हे पक्षीय राजकारणापेक्षा वरचे आहे आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत संसदीय नियम आणि परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहा यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘अमित शहा, माफी मागा,’ अशी घोषणाबाजी केली.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग