ई २० बाबत अजून कोणताही निर्णय नाही; पेट्रोलियम राज्यमंत्री गोपी यांचे स्पष्टीकरण (Photo - X/@starhubglobal)
राष्ट्रीय

ई २० बाबत अजून कोणताही निर्णय नाही; पेट्रोलियम राज्यमंत्री गोपी यांचे स्पष्टीकरण

पेट्रोलमध्ये इथॅनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्के पातळीपेक्षा जास्त वाढवण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी राज्यसभेत दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथॅनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्के पातळीपेक्षा जास्त वाढवण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. भविष्यातील वाढ ही पुढील वैज्ञानिक अभ्यास आणि उद्योगांशी झालेल्या चर्चेनंतरच केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोपी म्हणाले की, आतापर्यंत सरकारने पेट्रोलमध्ये इथॅनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणताही पुढील निर्णय हा केवळ सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसेच वाहन उत्पादक, तेल विपणन कंपन्या आणि संशोधन संस्थांसह सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतरच घेतला जाईल.

दोन दशकांहून अधिक काळ टप्प्याटप्प्याने राबवलेल्या कार्यक्रमानंतर भारताने २०२०-२६ या पुरवठा वर्षात सरासरी मिश्रण २०१३-१४ मधील १.५३ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवून वेळेच्या पाच वर्षे आधीच २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे, असे गोपी यांनी सांगितले.

इंधनाशी संबंधित तक्रारी नाहीत

ई२० इंधनाशी संबंधित इंजिन बिघाड, इंधन पंप समस्या, गंज किंवा पाण्याच्या दूषिततेबाबत वाहन उत्पादक, ऑटोमोबाईल संघटना किंवा ग्राहक गटांकडून सरकारला कोणत्याही व्यापक किंवा सिद्ध झालेल्या तक्रारी मिळालेल्या नाहीत. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर उपस्थित केलेल्या चिंतांची दखल घेऊन त्यांची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल