राष्ट्रीय

प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची स्पष्टोक्ती

संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांचे विधान सभागृहात मागितल्याने ती चूक झाली

Swapnil S

इंदूर : मला प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. प्रभू राम आमच्या हृदयात आहेत, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

अयोध्येतील नव्याने बांधलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी त्यांना कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) बद्दल लोकांच्या मनात अविश्वास हळूहळू वाढत आहे असे सांगून निवडणूक आयोग गेल्या सहा महिन्यांपासून विरोधी पक्षांना ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी वेळ देण्यात अपयशी ठरला आहे, असा दावा त्यांनी केला.

ईव्हीएम मशीन्सच्या सॉफ्टवेअर आणि चिप तंत्रज्ञानाबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाच्या वृत्तीमुळे लोकांच्या मनात ईव्हीएमबद्दलचा अविश्वास हळूहळू वाढत आहे, असा दावा त्यांनी केला. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांचे विधान सभागृहात मागितल्याने ती चूक झाली. तोच काय तो दोष होता, असे सांगून त्यामुळे मोठ्या संख्येने विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले, आणि महत्त्वाची विधेयके चर्चेविना मंजूर करण्यात आली, असे ते म्हणाले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव