उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; लष्कराकडून १३५ पर्यटकांची सुखरूप सुटका, बचावकार्य सुरू (Photo-X)
राष्ट्रीय

उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; लष्कराकडून १३५ पर्यटकांची सुखरूप सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामुळे रस्ते संपर्क तुटल्याने अडकून पडलेल्या १३५ पर्यटकांना भारतीय लष्कराने सुखरूप बाहेर काढले आहे.

Swapnil S

गंगटोक : उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामुळे रस्ते संपर्क तुटल्याने अडकून पडलेल्या १३५ पर्यटकांना भारतीय लष्कराने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, लाचेन भागात अजूनही सुमारे १,००० पर्यटक अडकले असून, त्यांना लवकरात लवकर सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

पूर्व कमांडच्या अंतर्गत असलेल्या 'त्रिशक्ती कोअर'द्वारे हे बचावकार्य राबवले जात आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन हिम सेतू' असे नाव देण्यात आले असून, जोरदार बर्फवृष्टी आणि आव्हानात्मक हवामानातही लष्कराचे जवान कार्यरत आहेत. महत्त्वाच्या खिंडीतील रस्ते खुले करण्यात आले असून बचावकार्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे.

वैद्यकीय मदत

आतापर्यंत ३२ हलकी वाहने आणि १० मोटारसायकलींना सुरक्षित बाहेर काढले आहे. बर्फाच्छादित आणि चढणीच्या रस्त्यांवर अडकलेली नागरी वाहने ओढून नेण्यासाठी लष्करी वाहनांचा वापर केला जात आहे.

रस्ते दुरुस्ती काम

भारत-चीन सीमेजवळील लाचेन आणि चुंगथांग दरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. सीमा रस्ते संघटना लष्कराच्या सहकार्याने रस्ते साफ करणे, बर्फ हटवणे आणि संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सातत्याने करत आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा