राष्ट्रीय

WhatsApp : आता व्हाट्सअ‍ॅपवर शेअर करता येणार ओरिजनल क्वालिटीचे फोटो

प्रतिनिधी

आपल्या दैनंदिन जीवनात व्हाट्सअ‍ॅपचे (WhatsApp) महत्त्व हे प्रचंड वाढले आहे. अगदी वैयक्तिक आयुष्यापासून ते आपल्या व्यावसायिक जीवनात या अ‍ॅपचा वापर होतो. हे अ‍ॅप 'मेटा'च्या मालकीचे असून याचा वापर पाहता अनेकदा नवनवीन फीचर्स येत असतात. अशामध्ये आता आणखी एका फिचरवर व्हाट्सअ‍ॅप काम करत आहे. हे फिचर आल्यानंतर आपल्याला ओरिजिनल क्वालिटी फोटोस शेअर करता येणार आहेत. यामुळे फोटोच्या क्वालिटीमध्ये फरक पडणार नाही.

व्हाट्सअ‍ॅपवरील नवीन ऑप्शनच्या मदतीने युजर्स सेटिंगवर क्लिक करून फोटो शेअर करू शकता. या फीचरशी संबंधित नवीन सेटिंग ऑप्शनवर क्लिक केल्यावर फोटो शेअर करण्याचा पर्याय दिसतो. यामध्ये युजर्सला ओरोजिनल फॉरमॅटमध्ये फोटो शेअर करण्याचा पर्याय मिळणार आहे. यापूर्वी फोटो शेअर करताना त्याच्या क्वालिटीवर फरक पडत होता. व्हाट्सअ‍ॅपचे स्टोरेज वाचवण्यासाठी हे अ‍ॅप आपोआपच फोटो कॉम्प्रेस करत होता. मात्र, आता ओरिजिनल क्वालिटी फोटोसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्हाट्सअ‍ॅपवर फोटो शेअर करताना क्वालिटीची तक्रार येणार नाही.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण