राष्ट्रीय

आता विवाहासाठीही मिळणार कर्ज; मॅट्रीमोनी डॉटकॉमची ऑफर

सध्याच्या काळात विवाह जुळणे कठीण काम झाले. मुला-मुलीचे शिक्षण, नोकरी, राहण्याचे ठिकाण, जात-धर्म, उंची-वजन आदी सर्व निकष लग्न जुळवताना पाहिले जातात. पूर्वी नात्यागोत्यातील किंवा ओळखीतून लग्न सहज जमत होते. आता हम दो-हमारे एकच्या काळात नातेवाईक फारसे नसतात.

Swapnil S

चेन्नई : सध्याच्या काळात विवाह जुळणे कठीण काम झाले. मुला-मुलीचे शिक्षण, नोकरी, राहण्याचे ठिकाण, जात-धर्म, उंची-वजन आदी सर्व निकष लग्न जुळवताना पाहिले जातात. पूर्वी नात्यागोत्यातील किंवा ओळखीतून लग्न सहज जमत होते. आता हम दो-हमारे एकच्या काळात नातेवाईक फारसे नसतात. त्यामुळे लग्न जुळवतानाही ऑनलाईन ‘मॅचमेकिंग’ साइटची मदत घेतली जाते. आता मॅट्रीमोनी डॉटकॉम या जोड्या जुळवणाऱ्या साइटने ‘वेडिंगलोन्स डॉटकॉम’ ही विवाहासाठी कर्ज देणारी नवीन विस्तारीत सेवा सुरू केली.

सध्या विवाहाचा खर्च शहर किंवा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लग्नाचा हॉल, दागिने, मानपान, डेकोरेशन, वधू-वरांचे डिझायनर कपडे, कॅटरर्स, वधू-वरांचा मेकअप, वाहनांचा खर्च, वरात आदींवर भरपूर खर्च होतो. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे लग्नावर खर्च करत असतो. पूर्वी हॉलमध्ये होणारे विवाह आता डेस्टिनेशन वेडिंगमध्ये बदलले आहेत. रिसॉर्ट किंवा समुद्रकिनारी डेकोरेशन करून विवाह केले जातात. तसेच थीमवर आधारित लग्नाचे मंडप केले जातात. सध्या लग्नाचा कमीत कमी खर्च १० ते १५ लाख रुपये होतो. सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना हा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे कर्ज काढून लग्न केले जाते. सर्वसाधारणपणे कोणीही लग्नासाठी कर्ज देत नाही. त्यामुळे चढ्या दराने पतपेढी, वैयक्तिक कर्ज काढले जाते. त्यासाठी अनेक कागदपत्रे, जामीन आदींची तरतूद केली जाते. आता लग्नाच्या कर्जासाठी फार धावाधाव करायची गरज नाही. कारण मॅट्रीमोनी डॉटकॉमने कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. यासाठी कंपनीने आयडीएफसी, टाटा कॅपिटल, एल ॲॅण्ड टी फायनान्स यांच्यासोबत करार केला आहे. या वित्तीय कंपन्या कर्ज वाटप करणार आहेत.

मॅट्रीमोनी डॉटकॉमने सांगितले की, आमच्या कंपनीचे काम केवळ कर्ज विक्री नाही. आम्ही ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणार आहोत. गेल्या २० वर्षांपासून आम्ही यशस्वीपणे जोड्या जुळवत आहोत. योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी लाखो लोकांचा विश्वास आम्ही कमवला आहे. ‘वेडिंगलोन्स डॉटकॉम’ ही आमची विस्तारीत सेवा आहे. यात विवाहाचे नियोजन, बजेट व सोपी अंमलबजावणी आदींचा समावेश असेल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगवेल जानकीरमण यांनी सांगितले.

सध्या विवाहाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विवाहासाठी एकदम लाखो रुपये उभे करणे वधू-वरांना किंवा त्यांच्या पालकांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळेच ‘वेडिंगलोन्स’ वेबसाइटवर दाम्पत्य त्यांच्या विवाहासाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. तसेच सोशल मीडियावरून विवाह सोहळ्याची प्रसिद्धी होत असल्याने आपलाही विवाह दुसऱ्याच्या प्रमाणेच भव्य व्हावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यातून खर्च वाढत जातो.

ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न

‘वेडिंग लोन्स’ हे असुरक्षित वैयक्तिक कर्ज आहे. यात दाम्पत्याला विवाहासाठी रक्कम मिळते. त्यानंतर ठरावीक कालावधीत ‘ईएमआय’द्वारे हे कर्ज फेडायचे आहे. या वेडिंग लोन्सची प्रक्रिया पारदर्शी आहे. यात ग्राहकांचे हित जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो, असे जानकीरमण म्हणाले.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू