राष्ट्रीय

राम मंदिरात २२ जानेवारीला ;पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

राम मंदिराच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वर्गीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना कार्यक्रमाला बोलावले जाईल

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठापना केली जाईल, असे रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेशचे राज्यपाल उपस्थित राहतील.

राय म्हणाले की, देशातील सर्व पूजा पद्धतीचे ४ हजार संत या कार्यक्रमात सहभागी होतील, तर वैज्ञानिक, कलाकार, परमवीर चक्र सन्मानित सैनिकांचे नातेवाईक आदी २५०० जणांना आमंत्रित केले जाईल. राम मंदिराच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वर्गीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना कार्यक्रमाला बोलावले जाईल. १०० हून अधिक प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या मालकांना आमंत्रण दिले जाणार आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

ट्रॉफीवरून राडा! आशियाई विजेता भारतीय संघ चषकाविनाच मायदेशी परतणार; पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वींकडून करंडक स्वीकारण्यास नकार

मदतीचेही सुयोग्य वाटप व्हायला हवे!

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल आणि स्वदेशीचा जागर

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत