राष्ट्रीय

झारखंडमध्ये नक्षलींकडून एकाची हत्या

शुक्रवारी संध्याकाळी घरी परतल्यानंतर नक्षलवाद्यांच्या एका गटाने त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याची गोळ्या झाडून हत्या केली

Swapnil S

छैबासा : झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात माओवाद्यांनी बांदाबेडा गावात शुक्रवारी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका ३५ वर्षीय इसमाची गोळ्या झाडून हत्या केली.

टोंटो पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितेंद्र लागुरी असे या मृताचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी घरी परतल्यानंतर नक्षलवाद्यांच्या एका गटाने त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले. टोंटो आणि गोइलकेरा पोलिस ठाण्याच्या परिसरांसह कोल्हानमध्ये पोलिसांनी सुरू केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईमुळे नक्षलवादी हताश होऊन अशा कारवाया करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार; 'सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला'

राज्यात पावसाची तूर्त विश्रांती; जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज

अखेर अटक व राजीनामे! राम मंदिर अपहारप्रकरणी ८ अटकेत; चंपत राय यांचा राजीनामा

MPSC च्या पूर्वपरीक्षा आता संगणकावर; वर्षातून दोन ते तीन वेळा परीक्षा घेण्याची घोषणा

'सिंदूर'मधील ६ शहिदांची नावे प्रथमच जाहीर