संसद परिसरात विरोधकांची निदर्शने X
राष्ट्रीय

संसद परिसरात विरोधकांची निदर्शने

विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचार, राम मंदिर देणग्यांमधील कथित घोटाळा आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली.

Swapnil S

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचार, राम मंदिर देणग्यांमधील कथित घोटाळा आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली.

या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह विरोधी बाकांवरील अनेक प्रमुख खासदारांनी हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

प्रेरणास्थळ येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते संसद भवनाच्या मकर दरवाजापर्यंत खासदारांनी भव्य निषेध मार्च काढला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली