राष्ट्रीय

पाक लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; चकमकीत ५ घुसखोर ठार

पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये मंगळवारी घुसखोरीचा प्रयत्न केला.

Swapnil S

जम्मू : पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये मंगळवारी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. मात्र, पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत ५ पाक घुसखोर ठार झाल्याचे वृत्त आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आणि घुसखोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी झालेल्या कृत्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या या प्रकारामुळे भारतीय लष्कर सतर्क झाले आहे.

मंगळवारी, पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या गोळीबारात लष्कराने ५ घुसखोरांना ठार मारले. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे लष्कराने सांगितले. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला असता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार सुरु केला.

यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती लष्कराने दिली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरू होता, असेही भारतीय लष्कराने सांगितले. आमच्या सैन्याने नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

कोकणातील कातळशिल्पांवर बनणार आंतरराष्ट्रीय माहितीपट; सरकारकडून १४.५० कोटींच्या निधीला मान्यता

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज