देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

घरातून बाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि शक्य असल्यास इतरांनाही पाणी द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

किशोरी घायवट-उबाळे

देशभरात उष्णतेची लाट तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रचंड उकाड्यात सावध राहा, पुरेसे पाणी प्या आणि गरजूंना मदत करा, असा संदेश त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला.

'एक्स'वर पोस्ट करत मोदी यांनी उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांकडे लक्ष वेधले. "या तीव्र उष्णतेच्या हवामानात छोटी मदतही मोठा दिलासा ठरू शकते," असे त्यांनी म्हटले.

हायड्रेट राहण्याचा सल्ला

घरातून बाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि शक्य असल्यास इतरांनाही पाणी द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. उष्णतेत शरीरातील पाण्याची कमतरता टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

हीटस्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा जास्त थकवा जाणवत असल्यास तात्काळ सावलीच्या किंवा थंड ठिकाणी जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. गरज पडल्यास ORS किंवा पाणी द्यावे, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची विशेष काळजी घ्या

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणारे कामगार हे उष्णतेमुळे सर्वाधिक धोक्यात असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले.

पक्षी आणि प्राण्यांसाठीही ठेवा पाणी

उष्णतेमुळे पक्षी आणि भटके प्राणीही त्रस्त होत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घर, बाल्कनी किंवा दुकानाबाहेर पाण्याचे भांडे ठेवण्याचे आवाहन केले.

"तहानलेल्या पक्ष्यासाठी पाण्याचे छोटे भांडेही महत्त्वाचे ठरू शकते," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता 'कुलपती पदक'; राज्यपालांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

GSB गणपतीचे १२ सप्टेंबरपासून दर्शन; मंडळाने उतरवला ७०३ कोटींचा विमा

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज! राज्य शासनाचा निर्णय; स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय