काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल

लिचीची गोड चव, पुदिन्याचा फ्रेशनेस आणि लिंबाचा हलका आंबटपणा यामुळे हे ड्रिंक प्रत्येकाला नक्की आवडेल.
काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल
काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड आणि फ्रेश ड्रिंक्स पिण्याकडे अनेकांचा कल असतो. अशावेळी बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या रसाळ लिचीपासून तुम्ही स्वादिष्ट आणि रिफ्रेशिंग मॉकटेल तयार करू शकता. लिचीची गोड चव, पुदिन्याचा फ्रेशनेस आणि लिंबाचा हलका आंबटपणा यामुळे हे ड्रिंक प्रत्येकाला नक्की आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी काही मिनिटांत तयार होते.

काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल
Summer Drink : फ्रोजन वॉटरमेलन कूलर; उन्हाळ्यात देईल इंस्टंट थंडावा, वाचा रेसिपी

साहित्य :

  • ५ ते ६ लिची

  • ४ ते ५ पुदिन्याची पानं

  • अर्धा लिंबू

  • १/४ टीस्पून मीठ

  • अर्धा टीस्पून साखर

  • आवश्यकतेनुसार सोडा वॉटर

  • आवश्यकतेनुसार बर्फ

  • सजावटीसाठी लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची पानं

काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल
Summer Special : बाजारासारखे ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम आता घरच्या घरी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी

कृती :

सर्वप्रथम लिची सोलून त्यातील गर वेगळा करा. हा गर हलक्या हाताने क्रश करा किंवा थोडासा ब्लेंड करून घ्या.

आता एका ग्लासमध्ये लिचीचा गर, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला आणि वरून सोडा वॉटर ओता. सर्व मिश्रण हलक्या हाताने ढवळून घ्या.

शेवटी लिंबाचे स्लाइस आणि पुदिन्याची पानं घालून सजवा. तयार आहे थंडगार आणि रिफ्रेशिंग लिची मॉकटेल.

काही मिनिटांत तयार करा रिफ्रेशिंग लिची मॉकटेल; चव अशी की पुन्हा पिण्याचा मोह होईल
Summer Special : घरच्या घरी बनवा पेरू आईस्क्रीम; ५ पदार्थांत तयार होईल क्रीमी डेझर्ट

टिप्स :

  • अधिक चविष्ट बनवण्यासाठी थोडंसं काळं मीठ घालू शकता.

  • गोडपणा वाढवायचा असल्यास मधाचाही वापर करू शकता.

  • पार्टीसाठी सर्व्ह करताना ग्लासच्या कडेला लिंबाचा स्लाइस लावल्यास ड्रिंक अधिक आकर्षक दिसेल.

  • जास्त थंड ज्यूस आवडत असल्यास क्रश्ड आईस वापरा.

logo
marathi.freepressjournal.in