राष्ट्रीय

इंडिया आघाडीमार्फत जातीयतेच्या नावाखाली जनतेची पिळवणूक- मोदी

“राहुल गांधींनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली, पण आता देवासारखे लोक असलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणांविरोधात ते बोलत आहेत. जे स्वतः नशेत आहेत ते उत्तर प्रदेश आणि माझ्या काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

Swapnil S

वाराणसी : “राहुल गांधींनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली, पण आता देवासारखे लोक असलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणांविरोधात ते बोलत आहेत. जे स्वतः नशेत आहेत ते उत्तर प्रदेश आणि माझ्या काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. “परिवारवाद’, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेश अनेक दशकांपासून विकासात मागे राहिला आहे.”

विरोधी आघाडीवर हल्ला चढविताना मोदी पुढे म्हणाले की, त्यांना केवळ आपल्या कुटुंबीयांच्या हिताची काळजी आहेदलित आणि आदिवासींच्या कल्याणाचा ते विचारच करू शकत नाहीत. देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलेची निवड करण्यास काही विरोधकांनी तीव्र विरोधही केला होता, असेही यावेळी मोदी यांनी सांगितले. संत रविदास यांच्या पुतळ्याचे अनावरणही यावेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

संत रविदास यांच्या जयंतीसारख्या धार्मिक प्रसंगी आपण सर्वांचे त्यांच्या जन्मस्थानी स्वागत करीत आहोत. आपण खूप दूरवरून येथे आला आहात, मुख्यत्वे पंजाबमधून आपले बंधू-भगिनी आले आहेत, त्यामुळे वाराणसी हा मिनी-पंजाब झाला आहे. संत रविदास यांच्या संदेशानुसार भारत सध्या वेगाने विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. त्यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. मोदी गुरुवारी रात्री वाराणसी येथे पोहोचले असून त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले