राष्ट्रीय

'Gen Z काहीही करू शकतात!' पिवळी नाही केली जांभळी 'हळदी'; नवदांपत्याचा Video पाहून नेटकरी म्हणाले, 'थॅनोसचे नातेवाईक'

पारंपरिक पिवळ्या हळदीऐवजी जांभळ्या रंगाची 'पर्पल हल्दी' साजरी करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हटके प्रयोगावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mayuri Gawade

सध्या 'Gen Z' हा शब्द सोशल मीडियापासून देशभरातील चर्चांपर्यंत वारंवार ऐकायला मिळतो. प्रत्येक गोष्टीत हटके प्रयोग करण्यासाठी ओळखली जाणारी ही पिढी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं ते एका जोडप्याचं 'पर्पल हल्दी' सेलिब्रेशन. कपडे, प्री-वेडिंग शूट आणि लग्नाची थीम यामध्ये वेगळेपणा दाखवणाऱ्या या पिढीने आता चक्क हळद समारंभालाही नवा ट्विस्ट दिला आहे. पारंपरिक पिवळ्या हळदीऐवजी या जोडप्याने जांभळ्या रंगाची 'हल्दी' साजरी केली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पिवळ्या हळदीऐवजी जांभळी 'हळदी'

३१ जुलै रोजी कंटेंट क्रिएटर आलिया हिने तिचा मित्र आदित्य आणि मैत्रीण मानसी यांच्या प्री-वेडिंग हळद समारंभाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र, या व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते पारंपरिक पिवळ्या हळदीऐवजी वापरण्यात आलेल्या लॅव्हेंडर-जांभळ्या रंगाच्या पेस्टने.

व्हिडीओमध्ये नवरा-नवरी एकमेकांना जांभळ्या रंगाची पेस्ट लावताना दिसतात. काही दिवसांतच या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आणि तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

पाहा व्हायरल व्हिडिओ

परंपरा की ट्रेंड?

भारतीय लग्नांमध्ये हळद समारंभाला विशेष महत्त्व आहे. हळदीची पिवळी उटी शुभ मानली जाते. नवरा-नवरीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून हा विधी केला जातो. मात्र, या जोडप्याने पारंपरिक पिवळ्या रंगाऐवजी जांभळ्या रंगाची थीम निवडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

'Gen Z काहीही करू शकते'

व्हिडीओ व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींना जांभळ्या रंगाची ही हटके संकल्पना आवडली, तर अनेकांनी त्यावर मिश्कील प्रतिक्रिया देत कमेंट सेक्शन गाजवला. "Gen Z लोक काहीही करत असतात", "बाकी सगळं ठीक आहे, पण यांना थॅनोस का बनवलं?", "विधीच्या नावाखाली स्किनकेअर" अशा मजेशीर प्रतिक्रिया देत अनेकांनी या अनोख्या हळदीची खिल्ली उडवली.

दुसरीकडे, या प्रयोगाचं कौतुक करणाऱ्यांचीही संख्या कमी नव्हती. "धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातील डिलिटेड सीन वाटतोय", "Lavender Haldi before GTA 7 is wild", "बॉलिवूडही हा ट्रेंड कॉपी करेल", "करण जोहरला लग्नासाठी नवा रेफरन्स मिळाला" अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी या हटके थीमचं कौतुक केलं.

पारंपरिक विधींना आधुनिक ट्विस्ट देण्याचा हा प्रयत्न काहींना आवडला, तर काहींना तो अजिबात रुचला नाही. मात्र, या 'पर्पल हल्दी'ने सोशल मीडियावर चांगलीच रंगत आणली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली