अमित शहांची हकालपट्टी करा; 'पोलीस अत्याचारांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी', राहुल यांची मागणी 
राष्ट्रीय

अमित शहांची हकालपट्टी करा; 'पोलीस अत्याचारांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी', राहुल यांची मागणी

दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस अत्याचारांवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी अधिकच आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची तातडीने हकालपट्टी करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करावी अशा मागण्या त्यांनी केल्या.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस अत्याचारांवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी अधिकच आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची तातडीने हकालपट्टी करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करावी अशा मागण्या त्यांनी केल्या.

संसदेबाहेर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला की, त्यांना लोकसभेत बोलू दिले जात नाही. २० जुलै रोजी संसदेवरील मोर्चावर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांना छरऱ्यांच्या बंदुकीने (पेलेट गन) मारण्याचे आणि खिळे लावलेल्या लाठ्यांनी मारहाण करण्याचे आदेश दिले असावेत किंवा मग त्यांना या प्रकाराची कोणतीही माहिती नसावी. जर त्यांनी आदेश दिले असतील तर ते या अत्याचारासाठी जबाबदार आहेत आणि जर त्यांना माहिती नसेल तर ते अकार्यक्षम आहेत.

दरम्यान पेपरफुटीविरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील राहुल यांच्या भाषणाच्या वेळी मोठा गदारोळ झाला. गृहमंत्री लोकसभेत उपस्थित नाहीत कारण ते "घाबरले" आहेत, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्याला सत्ताधारी खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला.

गृहमंत्र्यांनीच पोलिसांच्या कारवाईला परवानगी दिली होती, असे गांधी यांनी म्हणताच सभापती ओम बिर्ला यांनी तातडीने हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, आजची चर्चा गृहमंत्र्यांवर केंद्रित नाही. राहुल गांधींना आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करावेत असे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांच्या माफीची मागणी केली. तुम्ही कोणत्या आधारावर हे वक्तव्य करत आहात, हे अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे रिजिजू म्हणाले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागले.

विद्यार्थी आणि अंधभक्त

एका १८ वर्षीय विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी 'विद्यार्थी', 'सर्वज्ञानी समजणारे' आणि 'अंधभक्त' यांच्यातील फरक सभागृहात मांडला. विद्यार्थी नम्र असतो आणि सत्याची कास धरतो, तर दुसरी श्रेणी स्वतःला देव समजून खोटे बिंबवण्याचा प्रयत्न करते आणि तिसरी श्रेणी म्हणजेच 'अंधभक्त' दुसऱ्या श्रेणीला देव मानू लागते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा

सरकारी कँटिनची तपासणी करा : न्यायालयाचे आदेश

NEET फेरपरीक्षेचा पेपर गुजरातमध्ये फुटला? रोहित पवारांचा आरोप

CJP Protest : पोलीस कारवाई योग्यच- जे. पी. नड्डा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी किती पैसे कमावले?