राष्ट्रीय

बिहार म्हणजे गुन्हेगारीची राजधानी! भाजप-नितीश सरकार फेल; राहुल गांधींची टीका

बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हेगारांनी उद्योगपती गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना पाटणाच्या गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. या हत्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली.

Swapnil S

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हेगारांनी उद्योगपती गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना पाटणाच्या गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. या हत्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सत्ताधारी भाजपने मिळून बिहारला भारताची गुन्हेगारीची राजधानी बनवली आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

व्यापारी गोपाल खेमका यांच्या हत्येमुळे भाजप आणि नितीश कुमार यांनी बिहारला गुन्हेगारीची राजधानी बनवली आहे, हे सिद्ध होते. बिहारमध्ये सध्या लूटमार, गोळीबार आणि खून अशा घटना घडत आहेत. येथे गुन्हेगारी सामान्य गोष्ट बनली आहे. हे डबल इंजिन सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या नागरिकांनो हा अन्याय आता सहन केला जाऊ शकत नाही. जे सरकार तुमच्या मुलांचे रक्षण करू शकत नाही ते तुमच्या भविष्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

बिहार वाचवण्यासाठी यावेळी मतदान करा

“प्रत्येक खून, प्रत्येक दरोडा, प्रत्येक गोळी ही बदलाची हाक आहे. आता एका नवीन बिहारची वेळ आहे. जिथे भीती नाही, तर प्रगती आहे. यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नव्हे तर बिहार वाचवण्यासाठी करायचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

पाटण्यातील एका आलिशान भागात दिवसाढवळ्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मृत्यूमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून खेमका यांच्या हत्येमुळे विरोधकांच्या हाती सरकारला कोंडीत पकडण्याचे आयते कोलीत मिळाले आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास