राष्ट्रीय

सरन्यायाधीशांच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; 'त्यांनी' हे टाळावयास हवे होते - अभय ओक

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भाचे राज वाकोडे यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरन्यायाधीशांनी त्यांच्या भाच्याचा...

Swapnil S

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भाचे राज वाकोडे यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात 'कॉलेजियम'ने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरन्यायाधीशांनी त्यांच्या भाच्याचा नावाला मान्यता देणाऱ्या 'कॉलेजियम' मध्ये म्हणजेच निर्णय प्रक्रियेत राहणे टाळावयास हवे होते.

माजी न्यायाधीश अभय ओक म्हणाले की, मी माझा मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडतो. प्रथम, जर अशी परिस्थिती उद्भवली की, उच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या किंवा 'कॉलेजियम'चा सदस्य असलेल्या जवळच्या न्यायाधीशांच्या नातेवाईकाची न्यायाधीशपदासाठी शिफारस केली असेल, तर संबंधित न्यायाधीशाने 'कॉलेजियम'च्या निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ नये. जर खरोखरच योग्य उमेदवार असेल, तर त्याला न्यायपालिकेने वंचित ठेवावे का, असाही प्रश्न आहे. परंतु या प्रकरणात मुख्य न्यायाधीशांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला नको होते.

विस्तार हवा होता

सरन्यायाधीश या प्रक्रियेत होते की नव्हते हे माहिती नाही, पण त्यांनी आणखी एका वरिष्ठ न्यायाधीशाचा समावेश करून 'कॉलेजियम'चा विस्तार करायला हवा होता. दरम्यान, अभय ओक यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सरन्यायाधीश असता तर तुमच्या भाच्याला तुम्ही न्यायाधीशपदाची शपथ घेऊ दिली असती का, याला उत्तर देताना अभय ओक म्हणाले की, हा एक काल्पनिक प्रश्न आहे, पण तरीही आपण हे टाळले असते.

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा