राजा रवी वर्मांचे चित्र १६७ कोटींना; सायरस पूनावाला यांनी केली खरेदी 
राष्ट्रीय

राजा रवी वर्मांचे चित्र १६७ कोटींना; सायरस पूनावाला यांनी केली खरेदी

प्रसिद्ध चित्रकारराजा रवी वर्मायांच्या १९ व्या शतकातील एका चित्राने भारतीय कलाविश्वात नवा इतिहास रचला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रसिद्ध चित्रकारराजा रवी वर्मायांच्या १९ व्या शतकातील एका चित्राने भारतीय कलाविश्वात नवा इतिहास रचला आहे. बुधवारी दिल्लीत पार पडलेल्या सफ्रन आर्ट लिलावात 'यशोदा आणि कृष्ण' हे चित्र तब्बल १६७ कोटी रुपये य़ा विक्रमी किमतीला विकले गेले आहे. कोणत्याही भारतीय कलाकृतीला आजवर मिळालेली ही सर्वाधिक मोठी रक्कम आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, अब्जाधीश उद्योजक सायरस पूनावाला यांनी हे चित्र खरेदी केले आहे.

यापूर्वीचा विक्रम एम.एफ. हुसेन यांच्या 'अनटाइटल्ड (ग्राम यात्रा)' या चित्राच्या नावावर होता, त्याला गेल्या वर्षी $१३.८ दशलक्ष म्हणजे सुमारे १२० कोटी रुपये मिळाले होते.

“राष्ट्रीय ठेवा असलेली ही कलाकृती वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी पाहण्यास उपलब्ध व्हावी, यासाठी मी पुढाकार घेईन,” असे पूनावाला यांनी म्हटल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

भारताच्या पुरातन वस्तू कायद्याअंतर्गत राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचा समावेश राष्ट्रीय कला ठेवा म्हणून केला जातो. त्यामुळे त्यांची चित्रं देशाबाहेर निर्यात करता येत नाहीत आणि केवळ भारतीय खरेदीदारच ती विकत घेऊ शकतात.

  • बुधवारी विकलं गेलेलं 'यशोदा आणि कृष्ण' हे चित्र ३५ बाय २८.२५ इंच आकाराचं आहे. कॅनव्हासवर तेलरंगात साकारालेलं हे चित्र १८९० च्या दशकातील आहे. तेव्हा राजा रवी वर्मांच्या कारकि‍र्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर होते.

  • या चित्रात लहानगा कृष्ण आणि त्याची पालनकर्ती आई यशोदा रेखाटले आहेत.

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

आसामचे मुख्यमंत्री सर्वाधिक भ्रष्ट - राहुल गांधी; मोदी, शहा, सरमा यांचे आसाममध्ये लँड एटीएम, काँग्रेसची टीका

Navi Mumbai : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा; सिडकोच्या अधिकाऱ्याचा प्रताप; ACB च्या चौकशीत उघड

निवडणूक रद्द करण्याचा भाजपचा डाव - ममता बॅनर्जी; बंगालमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना घेराव, ‘तृणमूल’च्या मदतनीस कंपनीवर पुन्हा छापे

Mumbai : गॅस तुटवड्याने बेस्टची उपाहारगृहे बंद; कामगारांवर उपासमारीची वेळ