राज्यसभा निवडणुकीपूर्वी २६ नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे यांचा समावेश; ११ जागांवर लढत 
राष्ट्रीय

राज्यसभा निवडणुकीपूर्वी २६ नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे यांचा समावेश; ११ जागांवर लढत

दहा राज्यांमधील ३७ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दहा राज्यांमधील ३७ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले नाहीत, त्यामुळे हे नेते मतदानाशिवायच राज्यसभेत पोहोचले. मात्र, बिहार, ओडिशा आणि हरियाणातील ११ जागांवर लढत निश्चित आहे. या राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक घेतली जाईल.

नामांकन मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर बिहारमधील ५, ओडिशामधील ४ आणि हरियाणामधील २ जागांवर १६ मार्च रोजी निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राज्यसभेत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार महाराष्ट्र (७)

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रामदास आठवले (आरपीआय-आठवले), विनोद तावडे (भाजप), रामराव वडकुते (भाजप), माया इवनाते (भाजप),ज्योती वाघमारे (शिवसेना -शिंदे), पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस),

काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवक निवडीला पुन्हा ‘ब्रेक’! आठ महिन्यांची प्रतीक्षा आणखी वाढली

ठाणे शहराला साथीच्या आजारांचा विळखा! दोन महिन्यांत मलेरियाचे २०८, तर डेंग्यूचे १३८ रुग्ण

Karad : सामाजिक वनीकरणातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; वडूज न्यायालयाचे आदेश

Raigad : जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात