राष्ट्रीय

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

Swapnil S

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. नाईक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली. रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. नाईक यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना घरातून तात्काळ फोंडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारावेळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रवी नाईक यांनी १९९१ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा रवी नाईक यांनी राजकीय प्रवास केला. १९८४ मध्ये रवी नाईक पहिल्यांदाच एमजीपीच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून आमदार झाले. १९९८ मध्ये ते उत्तर गोव्याचे काँग्रेस खासदारही होते. २००० मध्ये रवी नाईक भाजपमध्ये सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. २००२ मध्ये नाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००७ मध्ये त्यांनी दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम केले.

नाईक यांनी २०२१ मध्ये दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी फोंडा येथून भाजपच्या तिकिटावर लढवली आणि पहिल्यांदाच भाजपसाठी जागा मिळवली. नंतर सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव