राष्ट्रीय

३१ मार्च रोजी बँका सुरू की बंद? RBI ने केली महत्त्वाची घोषणा; प्राप्तीकरच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्या रद्द

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना ३१ मार्च रोजी शाखा उघडण्याचे निर्देश दिले असल्याने सर्व बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. ३१ मार्च हा रविवार असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आरबीआयने बुधवारी ही घोषणा केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारी व्यवहार हाताळणाऱ्या सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा ३१ मार्च २०२४ रोजी खुल्या राहतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. दरवर्षी ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पार पाडावेत यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) प्रणालीद्वारे ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत व्यवहार सुरू राहतील.

२२ ते २९ मार्च दरम्यान अनेक राज्यात बँकांना सुट्टी

पुढील आठवड्यात होळीचा सण येत आहे. या दरम्यान २२ ते २९ मार्च दरम्यान अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल. २५ मार्च रोजी देशात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. याआधी दुसऱ्या शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असेल. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार २२ मार्चला बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी असेल. यानंतर २३ मार्चला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल. २४ मार्च रोजी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. होळीनिमित्त २५, २६ आणि २७ मार्च रोजी विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत देशातील विविध राज्यांमध्ये २२ मार्च ते २९ मार्चपर्यंत बँकांना सुट्टी असेल. २५ मार्च रोजी होळीच्या दिवशी बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इम्फाळ, कोची, कोहिमा, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम वगळता देशभरात बँका बंद राहतील. २६ मार्च रोजी याओसांग दिनानिमित्त भोपाळ आणि इम्फाळमधील बँकांना सुट्टी असेल. २९ मार्च रोजी गुड फ्रायडेमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

प्राप्तीकरच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या रद्द

चालू आर्थिक वर्ष संपल्यामुळे आयकर विभागाने आपल्या सर्व कार्यालयांच्या गुड फ्रायडेसह शनिवार-रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. करविषयक काम पूर्ण करण्यासाठी विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २९ मार्च (शुक्रवार), ३० मार्च (शनिवार) आणि ३१ मार्च (रविवार) रोजी प्राप्तिकर विभागाची सर्व कार्यालये सुरू राहतील.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!