संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

संजय राऊतांवर भोपाळमध्ये गुन्हा दाखल; 'लाडली बहना' योजनेविषयीचे वक्तव्य भोवले

संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये खोटी अफवा पसरवल्याबदल गुन्हा दाखल झाला आहे.

Swapnil S

इंदूर: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील 'लाडली बहना योजना' बंद पडल्याचा दावा राऊतांनी केला होता. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये खोटी अफवा पसरवल्याबदल गुन्हा दाखल झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला.

मध्य प्रदेशमधील लाडली बहन योजनेविषयीचे वक्तव्य करणे संजय राऊतांना चांगलेच भोवले आहे. पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महिला मोर्चा जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांच्या तक्रारीवरून भोपाळ गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश सरकारची लाडली बाहना योजना ही केवळ राजकीय खेळी असल्याने बंद करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला होता.

याविषयी संजय राऊत म्हणाले की, "माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मी काय चुकीचे बोललो आहे? जेव्हा आम्हाला न्यायालयात बोलावतील, तेव्हा आम्ही आमची बाजू सांगू. खरोखर 'लाडली बहन'ची काय स्थिती आहे, हे यांनी जाहीर केले पाहिजे. महाराष्ट्रात 'लाडकी बहीण'च्या नावाखाली फसवाफसवी सुरु आहे, मतांसाठी लाडकी बहीण योजना आहे, असे ते म्हणाले.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप