समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो वादात; अरुणाचलच्या लोकांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे स्पर्धकाविरोधात FIR सोशल मीडिया
राष्ट्रीय

समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो वादात; अरुणाचलच्या लोकांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे स्पर्धकाविरोधात FIR

प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याचा 'इंडियाज गॉट लेटेंट' शो वादात अडकला आहे. या शोच्या एका स्पर्धकावर एफआयआर दाखल झाला आहे. स्पर्धकाने अरुणाचल प्रदेश आणि येथील लोकांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा त्यात आरोप करण्यात आला आहे. शोच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भागात अरुणाचलची स्पर्धक 'जेसी नबाम' (Jessy Nabam) हीने 'कुत्र्याच्या मांस खाण्या'विषयी...

Kkhushi Niramish

प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याचा 'इंडियाज गॉट लेटेंट' शो वादात अडकला आहे. या शोच्या एका स्पर्धकावर एफआयआर दाखल झाला आहे. स्पर्धकाने अरुणाचल प्रदेश आणि येथील लोकांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा त्यात आरोप करण्यात आला आहे. शोच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भागात अरुणाचलची स्पर्धक 'जेसी नबाम' (Jessy Nabam) हीने 'कुत्र्याच्या मांस खाण्या'विषयी ही वादग्रस्त टिप्पणी केली. याविषयी अरुणाचलच्या एका व्यक्तीने तिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर FIR दाखल करण्यात आला आहे.

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये एका भागात समय रैनाने जेसीला कार्यक्रमादरम्यान 'तिने कधी कुत्र्याचे मांस खाल्ले आहे का?', असा प्रश्न केला. यावेळी ती म्हणाली की तिने कधीही कुत्र्याचे मांस खाल्लेले नाही. मात्र, अरुणाचलमधील लोक कुत्र्याचे मांस खातात. तसेच तिने दावा केला की, ते कधी-कधी त्यांच्या पाळीव कुत्र्याला देखील खातात. यावर या शोचे जज बलराज सिंघ यांनी याला एक 'जोक' म्हणून घेतले. मात्र, जेसी ने हे खरं असल्याचे सांगितले.

हा व्हिडिओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावर 'अरमान राम वेल्ली बाखा' (Armaan Ram Welly Bakha) या व्यक्तीने इटानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तो अरुणाचलच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेपा येथील रहिवासी आहे. यामध्ये त्याने जेसीवर अरुणाचल प्रदेशच्या आदिवासी जनजातीबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप केला. तसेच त्याने कडक कारवाईची मागणी केली. जेणेकरून पुन्हा शोमध्ये, असे कोणी करू नये. अरमान रामच्या तक्रारीनुसार 31 जानेवारीला जेसी विरोधात 'FIR' दाखल करण्यात आला.

A copy of the FIR | Photo from X (Twitter)

काय आहे इंडियाज गॉट लेटेंट शो?

इंडियाज गॉट लेटेंट हा एक कॉमेडी शो आहे. या शो मुळे स्टँड अप कॉमेडियन समय रैना हा प्रसिद्धीच्या झोतात आला. हा शो यु ट्यूबवर सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या कॉमेडी शो पैकी एक आहे. उर्फी जावेद, राखी सावंत, तन्मय भट्ट, फराह खान, भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, रफ्तार, पूनम पांडे, टोनी कक्कर, अविका गोर, रघु राम यांसारखे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये पाहुणे म्हणून आले आहेत.

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव