राष्ट्रीय

केजरीवालांबाबत निर्णय सरन्यायाधीशच घेतील

सुटीकालीन पीठासमोर जामिनाला मुदतवाढ देण्याची मागणी का करण्यात आली नाही, असा सवाल...

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी अंतरिम जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली असून त्यावर लवकर सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय सरन्यायाधीश घेतील, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्य प्रकरणातील निर्णय आधीच राखून ठेवण्यात आला आहे.

न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांच्या सुटीकालीन पीठाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. न्या. दीपांकर दत्त यांच्या सुटीकालीन पीठासमोर जामिनाला मुदतवाढ देण्याची मागणी का करण्यात आली नाही, असा सवाल न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या सुटीकालीन पीठाने केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना केला.

गेल्या आठवड्यात न्या. दत्त यांच्या सुटीकालीन पीठासमोर आपण ही मागणी का केली नाही, हा औचित्याचा प्रश्न असल्याने त्याबाबत सरन्यायाधीशांना निर्णय घेऊ द्या, आम्ही ही मागणी निर्णय घेण्यासाठी सरन्यायाधीशांकडे पाठवू, असे पीठाने म्हटले आहे. न्या. खन्ना आणि न्या. दत्त यांच्या पीठाने मुख्य याचिकेवरील निर्णय राखून ठेवला असल्याने ही मागणीही सरन्यायाधीशांसमोर योग्य त्या आदेशासाठी ठेवणे उचित ठरेल, असे पीठाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार