राष्ट्रीय

धुक्यात अपघात; ट्रकची स्कूल बसला धडक; १० विद्यार्थी जखमी

पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना रुग्णालयात पाठवले

Swapnil S

बुलंदशहर : सकाळच्या धुक्यात ट्रक आणि स्कूल बसच्या झालेल्या धडकेत स्कूल बसमधील दहा विद्यार्थी जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी येथील अनुपशहर परिसरात ही दुर्घटना झाली. संबंधित ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिरौली गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक केल्यानंतर ट्रकने बसला धडक दिल्याने सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात झाला. धुक्यामुळे ट्रक चालकाला समोरून येणारी बस न दिसल्याने अपघात झाल्याचे समजते.

अनुप शहरचे मंडळ अधिकारी अनूप सिंह यांनी सांगितले की, बसमध्ये २८ विद्यार्थ्यांसह ३३ लोक होते. पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना रुग्णालयात पाठवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. एकूण जखमी मुलांपैकी चार मुलांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय जाळलं, ४ जणांचा मृत्यू, कर्फ्यू लागू

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

Satara : मालदन गावच्या वैष्णवी काळेची Google मध्ये निवड