X/ himantabiswa and ANI
राष्ट्रीय

आसाममधील सेमीकंडक्टर प्रकल्प २०२५ पासून कार्यान्वित होणार; टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांची घोषणा

टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा २७ हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प २०२५ पासून आसाममध्ये कार्यान्वित होणार आहे, अशी घोषणा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केली. या प्रकल्पामुळे २७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

Swapnil S

जागीरोड : टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा २७ हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प २०२५ पासून आसाममध्ये कार्यान्वित होणार आहे, अशी घोषणा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केली. या प्रकल्पामुळे २७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आसामच्या १ हजार जणांना कंपनीने नोकरी दिली आहे. सेमीकंडक्टर यंत्रणेशी संबंधित अन्य कंपन्यांमध्येही आसामी तरुणांना रोजगार देण्याबाबत पावले उचलली जातील. या प्रकल्पातून २७ हजार जणांना रोजगार दिला जाणार आहे. त्यात १५ हजार जणांना प्रत्यक्ष, तर १२ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. आम्हाला वेगाने काम करायचे असून फॅक्टरी उभारण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. २०२५ पर्यंत ही फॅक्टरी तयार होऊन त्यातून उत्पादन सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व सर्मा म्हणाले की, आसाममध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन होणे हा राज्यासाठी सुवर्ण दिवस आहे. ही कंपनी उभी राहण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या प्रकल्पामुळे राज्यातील उद्योगांना चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी