राष्ट्रीय

Shradha Walker case: श्रद्धा वालकरचा जीव वाचवता आला असता? २०२०मधल्या एका पत्राची प्रत वायरल

आफताबने (Shradha Walker case) श्रद्धा वालकरला यापूर्वीही मारहाण केली होती. एवढचं नव्हे तर तिने पोलिसांकडे तक्रारदेखील केली होती.

प्रतिनिधी

श्रद्धा वालकर हत्या (Shradha Walker case) प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. बुधवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबने श्रद्धाला यापूर्वीही मारहाण केली होती. तिने लिहिले २ वर्षापूर्वीचे पात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. साधारण नोव्हेंबर २०२०मध्ये श्रद्धाने पालघर पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धाने आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला, अशी तक्रार केली आहे. माझी हत्या करुन तुकडे करेल, अशी धमकीही आफताबने दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. वेळीच जर या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर तिचा जीव वाचवता आला असता अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात श्रद्धाने तक्रार केली होती. आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यानचा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर आफताबने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. आफताबने केलेल्या मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते. तिच्या मानेलाही दुखापत झाली होती, अशी माहिती ओझोन हॉस्पिटलच्या डॉ. साईप्रसाद शिंदे दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत