राष्ट्रीय

सिंगापूरच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची स्थापना हा एक पथदर्शक उपक्रम आहे.

वृत्तसंस्था

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री गुन किम योंग आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश असलेल्या भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या (आयएसएमआर ) उद्घाटन सत्राच्या फलश्रुतीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. लॉरेन्स वोंग यांची उपपंतप्रधान म्हणून ही पहिलीच भारत भेट आहे.

भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची स्थापना हा एक पथदर्शक उपक्रम आहे. या उपक्रमामागची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती आणि भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ठ्यपूर्ण स्वरूप ती प्रतिबिंबित करते. प्रतिनिधीमंडळाने विस्तृत चर्चेची विशेषत: डिजिटल कनेक्टिव्हिटी, फिनटेक, हरित अर्थव्यवस्था, कौशल्य विकास आणि अन्न सुरक्षा या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये झालेल्या विस्तृत चर्चेची माहिती पंतप्रधानांना दिली.

पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि आयएसएमआरसारख्या उपक्रमांमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल,अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधानांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली आणि सिंगापूरच्या जनतेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस