राष्ट्रीय

न्यायिक चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहणार; पर्यावरण नेते सोनम वांगचूक यांचा निर्धार

तुरुंगात असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लडाखमधील जनतेला शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन करत राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण आणि राज्याच्या दर्जासाठी सुरू असलेला संघर्ष गांधीवादी अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवावा, असे आवाहन जनतेला केले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी रविवारी दिली.

Swapnil S

लेह : तुरुंगात असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लडाखमधील जनतेला शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन करत राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण आणि राज्याच्या दर्जासाठी सुरू असलेला संघर्ष गांधीवादी अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवावा, असे आवाहन जनतेला केले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी रविवारी दिली. तसेच न्यायिक चौकशीच्या आदेशापर्यंत आपण तुरुंगात राहण्यास तयार आहाेत, असे वांगचूक यांनी सांगितले.

वांगचूक यांनी हा संदेश लेह शिखर परिषदेचे कायदेशीर सल्लागार हाजी मुस्तफा यांच्यामार्फत दिला. मुस्तफा आणि वांगचुक यांचे मोठे भाऊ त्सेतन दोर्जे लेय यांनी शनिवारी राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात त्यांची भेट घेतली.वांगचूक म्हणाले की, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेची स्वतंत्र न्यायिक चौकशी होईपर्यंत ‘मी तुरुंगात राहण्यास तयार आहे.’ ‘मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक आहे. सर्वांना असलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आभारी आहे. हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना आणि जखमी व अटक झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो,’ असे वांगचूक म्हणाले. वांगचूक यांनी चार जणांच्या मृत्यूबाबत स्वतंत्र न्यायिक चौकशीची मागणी पुन्हा केली आणि सांगितले की, ‘ती चौकशी होईपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे.’

सुप्रीम कोर्टात मोठा गदारोळ; CJI गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न

''रोहित पवारांना फोटो कुठून मिळाला?'' रमी प्रकरणी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव; माफीची मागणी

भिक्षागृहातील भिक्षुकांच्या मानधनात वाढ; आता दररोज ५ ऐवजी ४० रुपये मिळणार, ऑक्टोबरपासून मिळणार वाढीव मानधन

‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; भारतीय हवामान खात्याचा दिलासा

उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!