कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चांना जोर; काँग्रेसचा इन्कार (Photo-X)
राष्ट्रीय

कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चांना जोर; काँग्रेसचा इन्कार

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून त्यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांना आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून त्यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांना आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत काँग्रेसने याला अधिकृत दुजोरा दिला नसून या सर्व चर्चा म्हणजे "केवळ तर्क-वितर्क आणि अफवा" असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत झालेली वरिष्ठ नेत्यांची दिवसभर चाललेली बैठक ही केवळ आगामी राज्यसभा आणि राज्याच्या विधान परिषद निवडणुकांबाबत होती, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.

सिद्धरामय्या यांना याबाबत सूचित करण्यात आले असून संभाव्य बदलाबाबत विचार करण्यास त्यांना अवधी देण्यात आला आहे असे वृत्त आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन्ही निवडणुकांसाठी पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र, राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील प्रदीर्घ सत्तासंघर्षावर काही तोडगा निघणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे, सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही आपापल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले होते.

दक्षिण भारतातील या महत्त्वाच्या राज्यात सुरू असलेल्या या वादाच्या केंद्रस्थानी डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची मागणी आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे 'आश्वासन' देण्यात आले होते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या 'इंदिरा भवन' या मुख्यालयात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह कर्नाटकच्या वरिष्ठ नेत्यांशी अनेक तास चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसी सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग