राष्ट्रीय

सुनेत्रा पवार दिल्लीत होणार शरद पवारांच्या शेजारी; परंपरेला बगल देत दिल्लीत मिळाला मोठा बंगला

विधानसभा निवडणुकीतील यशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगला देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील यशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगला देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सर्वसाधारणपणे प्रथमच खासदार होणाऱ्या व्यक्तीला असा मोठा बंगला दिला जात नाही. सुनेत्रा पवार यांना मोठा बंगला मिळाला, त्याचा संबंध अजित पवार यांचे दिल्लीत वजन वाढल्याशीही जोडला जात आहे.

एका वृत्तानुसार, सुनेत्रा पवार यांना दिल्लीच्या ल्युटन्सच्या ११ जनपथवरील टाइप-७ बंगला देण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे हा बंगला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथस्थित टाइप-८ बंगल्याला अगदी चिकटून आहे. शरद पवार तिथे आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहतात.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तब्बल ४१ जागा मिळाल्या. याउलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे अजित पवारांची दिल्लीतील ताकद वाढली आहे. यामुळेच सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठ्या बंगल्याचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे.

संजय राऊत यांची बंगल्यावर हरकत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या बंगल्यावर हरकत नोंदवली आहे. ते म्हणाले, मी अनेक वर्षांपासून खासदार आहे. मी पहिल्यांदा खासदार झालो होतो, तेव्हा आम्हाला साधे घर दिले गेले. पण सुनेत्रा पवार यांना टाइप-७ दर्जाचा बंगला देऊन भाजपने अजित पवार यांची सोय केली. कदाचित त्यांना दिल्लीत येता-जाता यावे यासाठी हे केले असावे. भाजप हे जाणूनबुजून करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे कारस्थान केले जाते. दिल्ली ही कपटकारस्थानांची राजधानी आहे. दिल्लीत जितके कारस्थान रचले जाते, तेवढे जगात कुठेही दिसून येत नाही.

सोनिया गांधी, नड्डाही शेजारी

उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या शेजाऱ्यांमध्ये शरद पवारच नव्हे, तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या